व्याख्यानमालेत सहावे पुष्प..
"दक्षिण कोरियाची शिक्षणपद्धती..."
शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई सर्व शिक्षणप्रेमींसाठी "देशोदेशीच्या शिक्षणपद्धती" या व्याख्यानमालेतील सहावे पुष्प शनिवार, २३ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता. दक्षिण कोरियाच्या शिक्षणपद्धतीचे अभ्यासक धनवंती हर्डीकर या "दक्षिण कोरियाची शिक्षणपद्धती..." याविषयावर गुंफणार आहेत. झूम मीटिंग आणि फेसबुक लाईव्ह (ycp100) या दोनपैकी एका माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होता येईल. इच्छुक शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमी यांनी डॉ. माधव सूर्यवंशी यांच्याकडे 9967546498 या क्रमांकावर आपली नाव, राहण्याचे ठिकाण, व्हाट्सअँप क्रमांक, व्यवसाय ही माहिती पाठवावी. झूमवर 100 एवढीच क्षमता असल्यामुळे सर्व इच्छुकांना तिथे सामावून घेता येणार नाही. ज्यांना झूमवर सामावून घेता येणार नाही त्यांनी फेसबुक लाईव्हवर हा कार्यक्रम पहावा, अशी नम्र विनंती आहे. ही सर्व व्याख्याने https://www.youtube.com/c/YashwantraoChavanPratishthan/featured या युट्युब चॅनेलवरही टाकण्यात येईल. त्यामुळे ज्यांना या विषयात रस आहे, ते आपल्या सवडीनुसार ही व्याख्याने ऐकू/पाहू शकतील.
- डॉ. वसंत काळपांडे,
मुख्य संयोजक,शिक्षण विकास मंच,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
व्याख्यानमालेत पाचवे पुष्प..अमेरिकेची शिक्षणपद्धती....
शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई सर्व शिक्षणप्रेमींसाठी "देशोदेशीच्या शिक्षणपद्धती" या व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प शनिवार, १६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकेच्या शिक्षणपद्धतीचे अभ्यासक प्रीति कामत-तेलंग या "अमेरिकेची शिक्षणपद्धती" याविषयावर पाहण्यासाठी व बघण्यासाठी फेसबुक लिंक : https://fb.watch/32y6_ZfMTb/