यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक तर्फे
‘यशवंतगाथा’ कार्यक्रमाचे आयोजन...
नाशिक : महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ३६व्या पुण्यतिथीच्या पुर्वसंध्येला सुप्रसिद्ध वक्ते डॉ. स्वप्निल छाया विलास चौधरी यांच्या ‘यशवंतगाथा’ या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्हद्वारे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 24 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजता page@ycpnashik यावर हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी घटनांची, संघर्षाची, तात्विक आचरणाची, साधेपणाची, सुसंस्कृत विवेकी विचारांच्या राजकारणी व्यक्तींची, हळव्या साहित्यिकाच्या जीवनाचा वेध घेणारी अनोखी कहाणी आहे. यशवंतरावांचे जीवन विषयक चिंतन, विकासाविषयी दूरदृष्टी, बदलत्या राजकीय, सामाजिक बदलांविषयी विचारांचे दर्शन यातून घडते. यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान व विचारांचा ठेवा या माध्यमातून पोहोचण्यास मदत होणार आहे.
तरी जास्तीतजास्त संख्येने हा कार्यक्रम पाहण्याचे आवाहन संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे, डॉ. स्मिता मालपुरे-वाकेकर, सौ. ज्योती पावरा यांनी केले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र, नाशिक व
विश्वास ग्रुपतर्फेखुल्या ऑनलाईन काव्यस्पर्धेचा निकाल जाहीर....
नाशिक (प्रतिनिधी) : बदलणार्या सामाजिक वास्तवाचा, जीवनशैलीचा कोवीड-19 चा प्रादुर्भाव, त्याचबरोबर प्रेमाचं, भावभावनांचं प्रतिबिंब, शेतकर्यांच्या दु:खाचं आणि चिंतन करणार्या कवितांनी बहर कवितेच्या ऑनलाईन काव्यस्पर्धेत कवींनी आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविले. सदर स्पर्धेकरीता महाराष्ट्रातील मुंबई, चंद्रपूर, रायगड, कोल्हापूर, बुलढाणा, पुणे, अहमदनगर, गडहिंग्लज, नांदेड, सोलापूर, अकोला व नाशिक अशा विविध ठिकाणांहून स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला व वैशिष्ट्यपूर्ण कवितांनी स्पर्धेची गुणवत्ता वाढविण्यास मदत केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे
प्रथम क्रमांक : श्वेता अजय पाटील, धुळे - रुपये 2001 व प्रमाणपत्र कवितेचे नाव : आयुष्याची जीवनगाथा
द्वितीय क्रमांक : सायली रविंद्र पवार, साक्री, जि.धुळे - रुपये 1501/- व प्रमाणपत्र कवितेचे नाव : हे नारी
तृतीय क्रमांक : तेजस्वी रविंद्र महाडिक, नवी मुंबई - रुपये 1001/- व प्रमाणपत्र कवितेचे नाव : मुंबईचे आत्मगीत
उत्तेजनार्थ क्र. 1 : सुनील म्हसकर, शहापूर, जि. ठाणू - रुपये 501/- कवितेचे नाव : सृष्टीचे नंदनवन करण्या
उत्तेजनार्थ क्र. 2 : आस्था शालिकराम घरडे, चंद्रपूर, जि. चंद्रपूर - रुपये 501/- कवितेचे नाव : आई
उत्तेजनार्थ क्र. 3 : श्रद्धा निगडे, मुलुंड, मुंबई - रुपये 501 कवितेचे नाव : अवकाश
तरी या खुल्या ऑनलाईन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे, डॉ. स्मिता मालपुरे-वाकेकर, सौ. ज्योती पावरा आदिंनी अभिनंदन केले आहे.