विद्यार्थ्यांनी घेतला UPSC / MPSC
स्पर्धापरिक्षा मार्गदर्शन शिबिराचा लाभ
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई संचालित यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय यांच्या विद्यमाने UPSC / MPSC स्पर्धा परिक्षांसंदर्भात मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. द युनिक अकॅडमी, मुंबईचे मंगेश खराटे, माधवी तटवरे, अजित खराडे आणि पोलिस उप निरिक्षक सुशांत खराटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी विद्यार्थ्यांना स्वानुभव सांगितला. स्पर्धा परिक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण होतात. गैरसमज करून न घेता अभ्यास कसा करावा, अभ्यासाचे नियोजन कशा प्रकारे करावे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिस उप निरिक्षक सुशांत खराटे यांनी प्रश्नोत्तरावेळी विद्यार्थ्यांना दिली.
UPSC / MPSC स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन शिबिर...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई संचालित यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय यांच्या विद्यमाने UPSC / MPSC स्पर्धा परिक्षांसंदर्भात मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ४ एप्रिल २०१९रोजी सायंकाळी ४ वाजता, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे द युनिक अकॅडमी, मुंबईचे मंगेश खराटे, माधवी तटवरे तसेच डॉ. पूनम जयवर, प्रा. अजित खराडे हे विनामूल्य मार्गदर्शन करणार आहेत. पोलिस उप निरिक्षक सुशांत खराटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अधिक माहितीसाठी अनिल पाझारे, ग्रंथालय संसाधन व ज्ञान व्यवस्थापक ९८२१६८११४७ या क्रमांकावर संपर्क करावा.
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय
ग्रंथालयाविषयी माहिती
जगातील ज्ञानामध्ये दरवर्षी भर पडत आहे. त्यामुळे ग्रंथ, ज्ञान साधने मोठ्या संख्येने प्रसिद्ध होत आहेत. ग्रंथालयातील वाचक वर्गाचे समाधान होण्यासाठी आपण तशा प्रकारच्या ग्रंथालयातून सेवा दिल्या जातात. गेल्या वीस वर्षात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने झेप घतेली आहे. या क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन झाले आहे. सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होत आहे. सध्या सर्वत्र ग्रंथालयाचे व माहिती केंद्रे स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर स्थापन झाली आहेत. ती ज्ञान प्रसाराच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शास्त्रीय व इतर संशोधनाचा वेगाने विकास होत आहे.
ग्रंथपेमी मा. यशवंतराव चव्हाण यांची पुस्तके विक्रीकरिता ठेवण्यात आली आहेत. ग्रंथालयाने कांही महत्त्वाच्या विषयाची वृत्तपत्रीय कात्रणे वाचकांना हाताळता यावी याकरिता व्यवस्थित बांधणी करुन ग्रंथालयामध्ये संदर्भाकरिता ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थी, संशोधक यांच्याकरिता अद्यावत माहितीकरिता नियतकालिकांची बांधणी करुन संदर्भाकरिता ठेवली आहेत. ग्रंथालयात विविध नियतकालिके, समाजशास्त्र, शेती, इतिहास, कायदा, संस्कृती इ. विषयांवरील पुस्तके, आत्मचरित्रे, धर्मकोश, विश्र्वकोष, गॅझीटीयर, अॅटलास, इअरबुक, डिक्शनरी, निरनिराळ्या कायद्याचे ग्रंथ उपलब्ध आहेत. वेळोवेळी ग्रंथालयाला अनुसरुन नवीन पुस्तके खरेदी करण्यात येतात. ग्रंथालयीन नियमानुसार ग्रंथालयाची मांडणी केली आहे. ग्रंथालयाचा वाचकाकरिता जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच पुस्तके शोधण्याकरिता मशीन कॅटलॉगच्या सहाय्याने वाचकांना मदत होते. डिडिसी-२३ (डेव्ही डेसियल क्लासीफिकेशन) नुसार ग्रंथाचे वर्गीकरण केले आहे. मुख्य वर्गांक आणि त्याचे उपवर्ग यानुसार ग्रंथाची मांडणी केलेली आहे. सर्व ग्रंथ याच पद्धतीप्रमाणे कपाटात ठेवण्यात आले असून त्यामुळे संगणकीय सहाय्याने साहित्य शोध जलद गतीने व अचूक घेता येतो. विशेष ग्रंथालयीन नेटवर्क उदा. डेलनेटच्या माध्यमातून ऑनलाईन ग्रंथालयीन सेवा दिली जाते.
Useful Links/References
ERIC (Education Resources Information Centre)
https://eric.ed.gov/
DOAJ (Directory of Open Access Journals)
https://doaj.org/
Gutenberg
https://www.gutenberg.org/
Bookboon
http://bookboon.com/
Digital Commons Network
http://network.bepress.com/
Digital Book Index
http://www.digitalbookindex.org/about.htm
Internet Archive
https://archive.org/
Open Textbook Library
https://open.umn.edu/opentextbooks/
Infolibrarian
http://www.infolibrarian.com/digital.html
HEC NATIONAL DIGITAL LIBRARY PROGRAMME
http://www.digitallibrary.edu.pk/Index.php